Ganpat Gaikwad । सध्या एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उल्हासनगर गोळीबार प्रकरणी (Ulhasnagar firing case) भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी गणपत गायकवाड यांना उल्हासनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड व आणखी एका सहकार्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता.
कोर्टाचे काम सकाळी 11 वाजता सुरू होते मात्र भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या या सुनावणीसाठी आज सकाळी नऊ वाजता कोर्टाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. सुरक्षेच्या हेतूने गायकवाड यांना आज पहाटेच न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. या सुनावणी वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालय परिसरात मोठा बंदोबस्त देखील करण्यात आला होता.
Ganpat Gaikwad Firing । मोठी बातमी! गोळीबार प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड कोर्टात हजर
न्यायालयाच्या परिसरात 200 मीटर पर्यंत कोणालाही फिरकता येणार नाही असे आदेश देखील देण्यात आले आहेत. तर 200 मीटरच्या बाहेर पोलिसांनी बॅरिकेट लावून रस्ता बंद करत मोठा बंदोबस्त केला आहे. माध्यम प्रतिनिधींना देखील न्यायालयाच्या परिसरामध्ये 200 मीटर येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
maratha reservation | मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत खालावली