Ganpat Gaikwad । ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबारात आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव आणि त्याचा फरार मित्र नागेश बडेराव याचा पोलीस शोध घेत होते. एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांची सहा वेगवेगळी पथके तपास करत आहेत. सध्या याप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मागच्या काही दिवसापासून वैभव गायकवाड यांचा शोध पोलीस घेत होते. दरम्यान आता आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी त्यांचा मुलगा वैभव गायकवाडसह दोघांना अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनी ही कारवाई केली आहे. त्यांना आज उल्हासनगर कोर्टात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, भाजपसमर्थित आमदार गणपत गायकवाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय महेश गायकवाड यांच्यात जमिनीवरून बराच काळ वाद सुरू होता. संतप्त झालेल्या गणपत गायकवाड याने गेल्या आठवड्यात हिल लाइन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पीआय अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला होता.