Ganpat Gaikwad Firing । ब्रेकिंग! गणपत गायकवाड यांच्या अडचणीत मोठी वाढ; महिलेला ‘ते’ अपशब्द वापरल्यामुळे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Ganpat Gaikwad

Ganpat Gaikwad Firing । उल्हासनगर या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड हे पोलीस कोठडीत आहेत. मात्र आता त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावामध्ये असलेल्या जमिनीच्या वादातून महिलेला जातिवादक अपशब्द वापरणे आमदार गणपत गायकवाड यांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह आठ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Ganpat Gaikwad CCTV Footage । बिग ब्रेकिंग! गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट

तक्रारदार महिला ही द्वारली गावात राहत असून तिच्या मृत सासऱ्यांच्या नावावर द्वारली गावात जमीन आहे. ही महिला 31 जानेवारीला दुपारी आपल्या जाऊबाईसोबत जमिनीच्या ठिकाणी गेली होती. यावेळी त्या ठिकाणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह त्यांचे काही साथीदार देखील उपस्थित होते. या जमिनीच्या मालकी हक्काचा वाद न्यायालयामध्ये पोहोचला आहे. याबाबत निकाल लागणे बाकी असल्याने वादग्रस्त जमिनीभोवती पत्र्याचे कुंपण घालण्यास त्यांना विरोध केला. त्यावेळी आमदार गणपत गायकवाड हे फावड्याचा दांडका घेऊन महिलेच्या अंगावर धावले आणि जातीवाचक अपशब्द वापरला.

Ajit Pawar । ‘…तेव्हा मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही’, अजित पवारांचे सर्वात मोठे वक्तव्य

महिलेला जातीवाचक अपशब्द वापरून तुम्ही कोर्टात जा तुमची जमीन घेणारच असा दम देखील दिला. त्यानंतर गायकवाड यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी देखील यावेळी महिलांना शिवीगाळ केली असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. या तक्रारीवरून आमदार गणपत गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक करत आहेत.

Ganpat Gaikwad । सर्वात मोठी बातमी! गणपत गायकवाड यांच्या अडचणीत मोठी वाढ

Spread the love