Ganpat Gaikwad Firing । भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad Firing ) यांना आज उल्हासनगर चोपडा कोर्टात हजर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरामध्ये संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Abhishek Ghosalkar Firing । अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती!
त्याचबरोबर न्यायालयाच्या परिसरामध्ये वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. 200 मीटर पर्यंत कोणालाही न्यायालयाच्या आवारात फिरकता येणार नाही असे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या बाहेर 200 मीटर पोलिसांनी रस्ता बंद केला आहे. त्याचबरोबर माध्यम प्रतिनिधींना देखील न्यायालयात व न्यायालयाच्या परिसरात 200 मीटर येण्यास आज बंदी घालण्यात आली आहे.
Maratha Reservation । “माझा जीव गेल्यावर…”, मनोज जरांगे यांचा सरकारला गंभीर इशारा
गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच केलेल्या गोळीबारामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली होती. या गोळीबार नंतर गायकवाड यांनी माध्यमांना याबाबत प्रतिक्रिया दिली होती. मी गोळीबार केला असून मला कोणताही पश्चाताप नसल्याचे वक्तव्य आमदार गणपत गायकवाड यांनी केले होते. त्याचबरोबर त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते.
Sanjay Shirsath । ब्रेकिंग! संजय राऊतही सोडणार ठाकरेंची साथ? बड्या नेत्याचा दावा