Site icon e लोकहित | Marathi News

Ganpat Gaikwad Firing । आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचं CCTV आलं समोर; पाहा थरकाप उडवणारा गोळीबाराचा व्हिडीओ

Ganpat Gaikwad Firing Cctv Futage

Ganpat Gaikwad Firing । उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळी झाडली. गोळी लागल्याने गणेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही संपूर्ण घटना हिललाईन पोलीस ठाण्यात घडली. पोलिसांनी आरोपी भाजप आमदाराला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

Mahesh Gaikwad Health Update । शिंदे गटाचे महेश गायकवाड व्हेंटिलेटरवर; प्रकृती अतिशय चिंताजनक

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या सगळ्या झटापटीची, अंगावर येणाऱ्या क्रौर्याची सगळीच दृष्य त्या पोलिस स्टेशनच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहेत. सध्या याचा व्हिडीओ देखील देखील व्हायरल झाला आहे. अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Ajit Pawar । गोळीबाराच्या घटनेवर अजित पवार यांनी दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “एवढी टोकाची मजल…”

पाहा व्हिडीओ

महेश गायकवाड यांची प्रकृती कशी ?

डॉक्टरांनी महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा गोळ्या बाहेर काढल्या. महेश गायकवाड यांच्या प्रकृतीला असलेला धोका टळलेला नाही. त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अशी माहिती ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली आहे.

Mla Ganpat Gaikwad । गोळीबारानंतर भाजप आमदाराने एकनाथ शिंदे यांच्यावर केले गंभीर आरोप; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी माझे करोडो रुपये…”

Spread the love
Exit mobile version