Ganpat Gaikwad News । ब्रेकिंग! आमदार गणपत गायकवाड यांना मोठा धक्का; गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आमदारकीही जाणार?

Ganpat Gaikwad

Ganpat Gaikwad News । उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात मोठा वाद निर्माण झाला आहे. उल्हासनगरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. गोळीबाराची घटना हिललाइन पोलिस स्टेशनमधील एका वरिष्ठ पोलिस कर्मचाऱ्याच्या केबिनमध्ये घडली, जिथे दोन राजकारणी आणि त्यांचे समर्थक दीर्घकाळ चाललेल्या जमिनीच्या वादावर तक्रार नोंदवण्यासाठी जमले होते.

Mla Ganpat Gaikwad । गोळीबारानंतर भाजप आमदाराने एकनाथ शिंदे यांच्यावर केले गंभीर आरोप; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी माझे करोडो रुपये…”

या घटनेननंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना घडताच पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न तसेच शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हिललाईन पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, गायकवाड यांच्या अटकेनंतर आता त्यांची आमदारकी देखील जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Devendra Fadnavis । भाजप आमदाराने गोळीबार केल्यावर देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर; घेतला सर्वात मोठा निर्णय

पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न तसेच शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची माहिती विधिमंडळ सचिवालयाकडे देखील पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष याबाबत काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Mahesh Gaikwad News । महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट

Spread the love