Gas Cylinder Price । डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; गॅस सिलेंडरचे दर वाढले

Gas Cylinder Price

Gas Cylinder Price । देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. पेट्रोल, डिझेल सोबत आता गॅस सिलिंडरच्या किंमती सुद्धा अगदी गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. दरम्यान आता डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. (Gas Cylinder Price)

Gunaratna Sadavarte । गुणरत्न सदावर्ते यांना सर्वात मोठा झटका

भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर २१ रुपयांनी वाढवले आहेत. सलग दुसऱ्या महिन्यात ही वाढ करण्यात आली आहे. हा बदल व्यवसायिक सिलेंडरमध्ये झाला असून घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल २०० रुपयांची कपात केली होती. यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यात कुठलाही बदल करण्यात आला नाही.

Raj Thackeray । मराठी पाट्या लावा नाहीतर तोंडाला काळ फासू – मनसे आक्रमक

महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलेंडरच्या किमती बदलत असतात. त्यामुळे घरगुती सिलेंडरची किंमत वाढेल की काय अशी सर्वसामान्य लोकांना धास्ती असते. मात्र सध्या डिसेंबरमध्येही घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती जुन्याच दरांवर कायम आहे . मुंबईत गॅस सिलेंडरचे दर ९०२.५० रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपयांना उपलब्ध आहेत.

Manoj Jarange Patil । भुजबळ जर शेतकऱ्यांच्या बांधावर गेले तर बळीराजाच्या मागे साडेसाती लागेल – मनोज जरांगे पाटील

व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर किती?

दिल्ली – १७९६.५०
मुंबई – १७४९
कोलकाता – १९०८

Chhagan Bhujbal । ब्रेकिंग! छगन भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाचा कडाडून विरोध, मराठा आंदोलकांनी अर्धनग्न होत…

Spread the love