Gas cylinder Rate : ब्रेकिंग! घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी घट, मोदी सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

Breaking! Major reduction in domestic gas cylinder price, biggest decision taken by Modi government

Gas cylinder Rate : देशात प्रचंड महागाई वाढली आहे यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती गगनाला भिडल्याच्या पाहायला मिळत आहेत. सर्वसामान्य नागरिक गॅस दराबाबत सातत्याने तक्रार करताना दिसतात. गॅसचे वाढते भाव पाहता नागरिक मोदी सरकारवर कायम टीका करत असत. मात्र आता सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

Farmer News । मिरचीचं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा केविलवाणा प्रयत्न, चक्क बाटलीने पाजले पाणी

सर्वसामान्य लोकांच्या महागाईच्या तक्रारीची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी घट करण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने सर्वसामान्यांसाठी आज खूप मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरचे दर खूप कमी केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता देशभरात गॅस सिलेंडरचे दर हे दोनशे रुपये पर्यंत कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Gas cylinder Rate)

Agri News । संत्री उत्पादक शेतकरी फळगळतीमुळे संकटात, सरकारकडून मदतीची अपेक्षा

केंद्री मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता देशभरात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान याबाबत महत्त्वाची माहिती म्हणजे केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा फक्त उज्वला योजनेच्या ग्राहकांना होईल अशी देखील माहिती जारी करण्यात आली आहे.

Santosh Bangar । सर्वात मोठी बातमी! संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, ‘ती’ चूक पडली महागात

Spread the love