‘चला हवा येऊ द्या’ मध्ये येणार गौर गोपाळ दास! ‘या’ दिवशी दिसणार एपिसोड…

Gaur Gopal Das will appear in 'Chala Hawa Yeu Dya'! The episode to be seen on this day...

झी मराठीवरील “चला हवा येऊ द्या” ( Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाला लोकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद असतो. रोज रात्री प्रेक्षक हा कार्यक्रम आवडीने बघतात. यामधील भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, निलेश साबळे, भारत गणेशपुरे हे कलाकार लोकांना प्रचंड हसवतात. या कार्यक्रमातील एक आकर्षक गोष्ट म्हणजे दर आठवड्यात पाहुणे कलाकार त्यांच्या प्रमोशनसाठी येत असतात. यासाठी आत्तापर्यंत अनेक लोक या कार्यक्रमात पाहुणे म्हणून आले आहेत. मात्र या आठवड्यात एक आगळे वेगळे पाहुणे या मंचावर येणार आहेत.

Viral Video । अन् बायकोने नवऱ्याला मारायला सुरुवात केली; भर रस्त्यात झाला तमशा!

या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात गौर गोपाळ दास (Gaur Gopal Das) यांचे आगमन होणार आहे. खरंतर गौर गोपाळ दास हे सकारात्मक जीवनशैलीसाठी प्रेरणात्मक विचार मांडत असतात. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. गौर गोपाल दास यांच्या आगमनाची झलक प्रोमो मध्ये प्रेक्षकांना दिसली आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी हा पूर्ण एपिसोड तुम्हाला पाहता येणार आहे.

Amol Kolhe । मोठी बातमी! खासदार अमोल कोल्हे जखमी

कोण आहेत गौर गोपाळ दास ?

गौर गोपाळ दास यांचा जन्म महाराष्ट्रात १९७३ मध्ये झाला आहे. त्यांचे शालेय शिक्षण सेंट ज्युड हायस्कूल, देहूरोड, पुणे येथे पूर्ण झाले आहे. यानंतर त्यांनी कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणेमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा पुर्ण केला आहे. एवढंच नाही तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्येही त्यांनी पदवी प्राप्त केली आहे. १९९६ मध्ये ते इस्कॉनमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनीबलाइफ्स अमेझिंग सिक्रेट्स या नावाचं पुस्त त्यांनी प्रकाशित केलं. सध्या त्यांचे युट्यूबवर चॅनेल (Youtube Channel) असून त्यावर २ मिलीयनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

LPG । घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत समोर आली मोठी अपडेट!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *