Site icon e लोकहित | Marathi News

Congress । बिग ब्रेकिंग! लोकसभेअगोदरच काँग्रेसला मोठा धक्का, पक्षाच्या प्रवक्त्याने दिला राजीनामा

Congress

Congress । लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी संकटात सापडलेल्या काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. (Election 2024) काही दिवसांपूर्वीच माजी लोकसभा खासदार मिलिंद देवराआणि वांद्रेचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडली. अशातच आता काँग्रेसच्या बड्या नेत्यानेदेखील काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

Ajit Pawar । सख्खा भाऊ नाही तर शरद पवारांचे ‘हे’ नातेवाइक देणार अजितदादांची साथ

सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेस नेते आणि प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी पक्षाच्या सर्व पदांवरुन राजीनामा (Gaurav Vallabh Resigns) दिला आहे. सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नसून मी देशाची संपत्ती निर्माण करणाऱ्यांविरोधात बोलू शकत नसल्याने राजीनामा देत आहे, असे गौरव वल्लभ यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत गौरव वल्लभ यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना देखील पत्र लिहिले आहे.

Sanjay Nirupam Resign । सर्वात मोठी बातमी! काँग्रेसला भलंमोठं खिंडार, बड्या नेत्याने ठोकला पक्षाला रामराम

“पक्षाची वाटचाल चुकीच्या दिशेने सुरू असून सत्य लपवणे हा गुन्हा आहे. मला याचा भाग व्हायचे नाही. पक्षाने मला राष्ट्रीय प्रवक्ता बनवले तेव्हा मी माझे मत ठामपणे मांडले होते. पण मागील काही दिवसांपासून पक्षाच्या भूमिकेमुळे मी अस्वस्थ झालो आहे. पक्षात प्रवेश केला त्यावेळी मला असे वाटले की हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे,” अशी भूमिका गौरव वल्लभ यांनी मांडली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Beed News । बीड हादरलं! शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला, 8 जणांनी गाडी अडवून केली बेदम मारहाण

Spread the love
Exit mobile version