मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला अदानी समूह (Adani Group) भारतातल्या सर्वांत मोठ्या उद्योग समूहांपैकी एक आहे. विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे उद्योग आहेत. विमानतळ आणि बंदरांचा कारभार, उत्पादनांची आयात-निर्यात, सिमेंट उद्योग, मीडिया आणि अक्षय्य ऊर्जा या क्षेत्रांचा यामध्ये समावेश आहे. याच उद्योगांच्या जोरावर गौतम अदानी (Gautam Adani) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले आहेत. दरम्यान हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने सादर केलेल्या अहवालामुळे अदानी चांगलेच अडचणीत आले आहेत. ‘अदानी कॉर्पोरेट इतिहासातला सर्वांत मोठा घोटाळा करत आहेत’ असा आरोप या अहवालात करण्यात आला आहे.
कसबा-चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध होणार नाहीत; जयंत पाटील म्हणाले, “आज उमेदवार जाहीर….”
दरम्यान अदानींबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे समोर येत आहेत. गौतम अदानी यांनी आतापर्यंत दोन वेळा मृत्यूला अगदी जवळून पाहिले आहे. एकदा दहशतवादी हल्ल्यात तर दुसऱ्यांदा गुंडांनी केलेल्या अपहरणात त्यांनी मृत्युला चकवा दिला आहे. 1997 मध्ये गौतम अदानी यांचे गुंडांनी अपहरण केले होते. यावेळी गुंडांनी त्यांच्याकडे तब्बल 11 कोटी रुपयांची मागणी केली होती. या अपहरणामागे अंडरवर्ल्ड डॉन फजल उर रेहमान असल्याचे सांगितले जाते. यावेळी गौतम अदानी मृत्युच्या दाढेतून बाहेर पडले होते.
‘त्या’ एका चुकीमुळे आजपर्यंत मुख्यमंत्रीपद पदरात पडले नाही; अजित पवारांचा खुलासा!
यानंतर 2008 मध्ये मुंबईच्या ताज हॉटेलवर (Taj Hotel) दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी गौतम अदानी सुद्धा त्याच हॉटेलमध्ये होते. त्यावेळी ते दुबई पोर्टचे सीईओ मोहम्मद शराफ यांच्यासोबत वेदर क्राफ्टमध्ये डिनर करत होते. दरम्यान दहशतवादी हल्ला झाल्याचे समजताच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी लोकांना तळघरात नेले होते. यामध्ये अदानी देखील होते. यावेळी आपण 15 फूट अंतरावर मृत्यूला पाहिले आहे. असे गौतम अदानी एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार; राजकीय पक्षांची धाकधूक वाढली!