हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने सादर केलेल्या अहवालामुळे गौतम अदानी ( Gautam Adani) चांगलेच अडचणीत आले आहेत. ‘अदानी कॉर्पोरेट इतिहासातला सर्वांत मोठा घोटाळा करत आहेत’ असा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत अदानी यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र तरीदेखील ते आजही देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे.
कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सगळे कर्मचारी आमचेच…”
आता गौतम अदानींच्या संपत्तीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मागच्या तीन आठवड्यापासून अदानी समूहाचे शेअर्सचे दर वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये देखील वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. शेअर्सचे दर वाढल्यामुळे गौतम अदानींच्या संपत्तीमध्ये जवळपास 50 टक्क्यांची वाढ झाली आहे.
कर्मचाऱ्यांनी संप मागे घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महत्वाची माहिती!
दरम्यान, उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना मागच्या काही दिवसापासून व्यापार क्षेत्रात मोठे धक्के बसत आहेत. भारतातील दिग्गज उद्योगपती म्हणून त्यांची ओळख आहे. मागील वर्षी त्यांनी शेअर बाजारात विक्रमी कमाई केली होती. मात्र अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली असून ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकातील टॉप-20 अब्जाधीशांच्या यादीत देखील गौतम अदानी यांचे नाव नाही.
पठ्ठ्याचा नादच खुळा! चक्क बायकोच्या वाढदिवसासाठी ठेवला गौतमी पाटीलचा कार्यक्रम