गौतम अदानींच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा पार पडला; ‘या’ प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्यांची मुलगी होणार अदानींची सून!

Gautam Adani's youngest son's engagement took place; Adani's daughter-in-law will be the daughter of 'Ya' famous diamond traders!

हिंडेंनबर्ग संस्थेच्या अहवालामुळे चर्चेत आलेले गौतम अदानी सध्या एका नवीनच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी ( Gautam Adani) यांच्या घरी लवकरच लग्न सोहळा पार पडणार आहे. त्यांचा धाकटा मुलगा जीत अदानी याचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. प्रसिद्ध हिरे व्यापारी जमीन शाह ( Jamin Shah) यांची मुलगी दिव्या जमीन शाह हिच्यासोबत जीत अदानीचा साखरपुडा झाला असून लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत.

प्री वेडिंग शूट करायला गेले अन् घडलं भलतंच! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

गुजरातमध्ये अहमदाबाद येथे झालेल्या समारंभात दिव्या शहा व जीत अदानी यांचा साखरपुडा पार पडला. रविवारी (दि.12) हा सोहळा पार पडला. यासाठी शाह व अदानी कुटुंबातील सर्व सदस्य व त्यांचे जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. दरम्यान गौतम अदानी यांची भावी धाकटी सून दिव्या हिचे वडील जमीन शाह C.Dinesh & Co.Pvt.Ltd चे मालक आहेत.

मोठी बातमी! बारामतीमध्ये बायोगॅस टाकीची सफाई करताना चार जणांचा मृत्यू

कोण आहे जीत अदानी?

जीत अदानी हा गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा असून सध्या तो अदानी समूहाचा व्यवसाय सांभाळत आहे. 2019 पासून तो आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करत असून जीत अदानीची 2022 मध्ये अदानी समूहात उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्याने पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी मिळवली आहे.

मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन अजित पवार संतापले; म्हणाले, “गलिच्छपणाचं कामकाज…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *