‘या’ कारणामुळे गौतमी आणि उर्फीवर कारवाई करता येत नाही; रुपाली चाकणकर यांचे वक्तव्य  

Gautami and Urfi cannot be prosecuted for 'this' reason; Statement by Rupali Chakankar

गौतमी पाटील आणि उर्फी जावेद या दोघींचाही सोशल मीडियावर चांगला फॅनबेस आहे. या दोघींचे जितके चाहते आहेत तितकीच त्यांच्यावर टीका देखील केली जाते. गौतमी च्या नृत्य करण्यावरून व उर्फीच्या अजब गजब फॅशन सेन्समुळे या दोघींनाही कायम टोकले जाते. (Gautami Patil & Urfi Jawed) दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या टिकांच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट वक्तव्य केले आहे. 

‘या’ पद्धतीचा वापर करून किडनीमध्ये जमलेली घाण काढा बाहेर; वाचा सविस्तर

शीलतेची व अश्लीलतेची परिभाषा आपण ठरवू शकत नाही. याची परिभाषा स्थळ, काळ आणि वेळेनुसार बदलत असते. कायद्यातही याबाबत स्पष्ट व्याख्या नाही. उर्फी जावेद आणि गौतमी पाटील तुम्हाला अश्लील वाटत असतील पण दुसऱ्यांच्या नजरेत त्या शील असू शकतात. म्हणून आपण त्या दोघींवर कारवाई करू शकत नाही. असे रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar) म्हणाल्या आहेत. 

सावधान! कोरोनाचा धोका वाढतोय; धक्कादायक आकडेवारी आली समोर

एवढंच नाही तर घटना तुम्हाला, मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत असताना शीलता व अश्लीलतेची परिभाषा आपण ठरवू शकत नाही. यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट अश्लील वाटत असेल तर कदाचित दुसऱ्याला ती गोष्ट शील वाटू शकते. यामुळे स्थळ,वेळ आणि कालपरत्वे ही परिभाषा बदलते. तसेच राज्यघटनेने दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकारामुळे कोणी काय बोलावे, काय घालावे आणि काय खावे हे आपण ठरवू शकत नाही. असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी आपले स्पष्ट विचार मांडले आहेत.

“भर लग्नमंडपात नवरीने लगावली नवऱ्याच्या कानाखाली अन् पुढे घडले असे की…” पाहा Video

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *