
गौतमी पाटीलला ओळखत नाही, असा माणूस महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. गौतमीचे महाराष्ट्रभर चाहते आहेत. तिच्या कार्यक्रमांना लोकांना बसायला जागा उरत नाही एवढी गर्दी असते. अनेकदा बदनामी झाली, लोकांनी टीका केली परंतु तरी देखील गौतमी पाटीलने ( Gautami Patil) नाचायचे सोडले नाही. गौतमीचा सोशल मीडियावर सुद्धा मोठा चाहतावर्ग आहे. याठिकाणी सक्रिय राहून ती आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या पोस्ट व व्हिडिओ टाकत असते. ( Gautami Posted photos of Gifts from fans)
‘चला हवा येऊ द्या’ मध्ये येणार गौर गोपाळ दास! ‘या’ दिवशी दिसणार एपिसोड…
सोशल मीडियावर गौतमीचे डान्सचे व्हिडीओ चर्चेत असतात. ( Viral posts) मध्यंतरी तिचा बैलासमोर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओवर राजकीय वर्तुळातून सुद्धा प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या. सध्या गौतमी पाटीलची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तिने आपल्या चाहत्यांनी दिलेल्या गिफ्ट्सचे फोटो पोस्ट केले आहेत.
Rishabh Pant । मोठी बातमी! ऋषभ पंत याच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर
राज्यभरातील गौतमीच्या चाहत्यांनी गौतमीला विविध भेटी दिल्या आहेत. बऱ्याच चाहत्यांनी गौतमीला तिच्या फोटोंचे स्केच काढून गिफ्ट केले आहे. तसेच काही लोकांनी खास फ्रेम्स दिल्या आहेत, ज्यामध्ये गौतमीचे सुंदर फोटो आहेत. या पोस्टखाली तिने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहे. या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या असून आम्ही सुद्धा तुझ्यावर कविता किंवा निबंध लिहू शकतो, असे त्यामध्ये म्हंटले आहे.
LPG । घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत समोर आली मोठी अपडेट!