महाराष्ट्रात गौतमी पाटीलला ओळखत नाही, असे कोणी शोधूनही सापडणार नाही. मागच्या काही दिवसांत लावणी कलाकार म्हणून गौतमी पाटील प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. दरम्यान लावणीमध्ये अश्लील हालचाली करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात केला जातोय. याशिवाय गौतमीच्या कार्यक्रमात चुकीच्या घटना वारंवार घडत असल्याने तिचे कार्यक्रम बंद करण्यात यावेत अशी मागणी विविध संघटना व लावणी कलाकारांकडून सतत करण्यात येत आहे.दरम्यान सध्या गौतमीचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ब्रेकिंग! संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
गौतमीचा पुण्यातील एका कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गौतमीने एका लहान मुलाला डान्स करताना स्टेजवर बोलावून त्याच्या सोबत डान्स केला त्याचबरोबर मुलाला मांडीवर घेऊन किस केलं देखील आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
मोठी बातमी! संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना ठाकरे गटाला धक्का
दरम्यान, गौतमी ही ‘घुंगरू’ (Ghungru movie) या मराठी चित्रपटातून गौतमी पाटील चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. माढा, सोलापूर, हंपी आणि थायलंड या ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले आहे. या चित्रपटाचे लेखन व निर्मिती बाबा गायकवाड यांनी केली आहे . या चित्रपटात बाबा गायकवाड हे गौतमी सोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. लोककलावंतांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट असणार आहे.