Gautami Patil and Madhuri Pawar । पुणे : मागच्या काही दिवसापासून गौतमी हे नाव सातत्याने चर्चेत आहे. गौतमीच्या नृत्याला तोड नाही असं अनेक जणांचं म्हणणं आहे. गौतमी घराघरात लोकप्रिय झाली असून तिच्या कार्यक्रमाला देखील प्रेक्षकांची मोठी गर्दी असते. मात्र गौतमीला टक्कर देणारी महाराष्ट्रातील आणखी एक प्रसिद्ध नृत्यांगना म्हणजेच माधुरी पवार महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक कार्यक्रम गाजवण्यामध्ये या दोघीही अग्रेसर आहेत.
Onion Market Price । शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! ‘या’ ठिकाणी कांद्याला मिळाला सर्वोच्च भाव
या दोघींचा चाहता वर्ग मोठा असून आतापर्यंत चाहत्यांनी या दोघींना वेगवेगळ्या मंचावर पाहिला आहे. मात्र आता पहिल्यांदाच या दोघी एकत्र आणि एका मंचावर दिसल्या आहेत. माहितीनुसार, हडपसर मधील एका कॅफेच्या उद्घाटनासाठी माधुरी पवार आणि गौतमी पाटील या दोघींना आमंत्रित करण्यात आलं होतं. यामध्ये दोघींची ही क्रेझ जास्त असली तरी या कार्यक्रमांमध्ये गौतमीच्या डीजे शो वर माधुरीची मराठमोळी लावणी भारी पडल्याचे दिसले आहे.
दरम्यान, माधुरी बद्दल पाहिले तर झी युवा वाहिनीवरील ‘अप्सरा आली’ या डान्स रियालिटी शोची विजेती म्हणून माधुरीने तिच्या जिद्दीने आणि चिकाटीने यश मिळवले आहे. स्वतःच्या कलेच्या बळावर माधुरीने आज स्वतःच एक वेगळे स्थान देखील निर्माण केल आहे.