Site icon e लोकहित | Marathi News

Gautami Patil । बार्शीत गुन्हा दाखल होताच गौतमी पाटीलने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “मी फक्त…”

Gautami Patil. As soon as the case was registered in Barshi, Gautami Patil's first reaction was; Said, "I just..."

बार्शी पोलीस ठाण्यात गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. गौतमीच्या विरोधात पहिल्यांदाच तक्रार दाखल करण्यात आल्याने गौतमी पाटीलच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गौतमीचा बार्शीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनीच बार्शी पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे. गौतमी पाटील हिने माझी फसवणूक करून मला मानसिक त्रास दिला. असल्याचं गायकवाड यांनी तक्रारीमध्ये म्हंटल आहे. आता ही तक्रार दाखल होताच गौतमीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Complaint filed against Gautami Patil in Barshi Police Station)

मान्सूनबाबत सर्वात मोठी बातमी! राज्यात ‘या’ दिवशी होणार दाखल, हवामान तज्ञांचा अंदाज

एका वृत्तवाहिनीशी बोलताना गौतमी पाटील म्हणाली, “ मला याबाबत काहीच माहिती नाही, मी फक्त दुपारी याचा व्हिडीओ पहिला आहे. मी अजून याची कोणतीही माहिती घेतलेली नाही. त्यामुळे याबाबत मी पूर्ण माहिती काढून सविस्तर माहिती देईन. आता सध्या काहीच बोलू शकत नाही” असं गौतमी म्हणाली आहे.

प्रसिद्ध क्रिकेटपटूचं शार्दुलबद्दल संतापजनक वक्तव्य, WTC Final आधी नको ते बोलला अन्…

मात्र मी त्या कार्यक्रमाला वेळेत पोहचले होते. मी असं कोणत्याच कार्यक्रमाला उशिरा जात नाही. मला १० पर्यंत कार्यक्रमाची परवानगी असते त्यामुळे मी कोणत्याच कार्यक्रमाला जायला उशीर करत नाहीत. १० नंतर माझा कार्यक्रम बंद करावा लागतो. कारण माझ्या कार्यक्रमाला पोलीस असतात. त्यांची साथ असते. त्यामुळे त्यांचं म्हणणं मला ऐकावं लागणार. त्यामुळे याबाबत मी सविस्तर माहिती घेईल आणि मग आपल्याशी बोलेन असं गौतमी पाटील म्हणाली आहे.

Viral Video । चालत्या स्कूटीवर रोमान्स, कपलची बसण्याची स्टाईल बघून लोक म्हणाले…

Spread the love
Exit mobile version