Gautami Patil । गौतमीच्या कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्याच, पहिल्यांदाच घडलं असं; गौतमीच मार्केट डाऊन?

Gautami Patil. Chairs were empty in Gautami's program, this happened for the first time; Gautama market down?

सबसे कातील गौतमी पाटील असं म्हटलं की तरुणांच्या मनामध्ये हुरूप निर्माण होतो. मागच्या काही दिवसापासून गौतमी पाटील (Gautami Patil) चांगलीच चर्चेत आली आहे. ज्यावेळी गौतमी पाटील कार्यक्रमास हजर असते त्यावेळी लाखो प्रेक्षक तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजर असतात. परंतु नाशिकमध्ये गौतमी पाटील ज्या कार्यक्रमाला हजर होती त्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

Maharashtra Politics | मोठी बातमी! महाविकास आघाडी फुटायला सुरुवात झाली, कोणी केला गौप्यस्फोट?

नाशिकचा ठक्कर डोम येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम नवनिर्माण सेवाभावी संस्थेने (Navnirman Charitable Organization) आयोजित केला होता. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच हे असं घडलं होतं. या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांपेक्षा जास्त रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या. तिचा कार्यक्रम पहिल्यांदाच असा पार पडल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Arpita Khan | मोठी बातमी! सलमान खानची बहिण अर्पिताच्या घरी चोरी

कार्यक्रमाची तिकीट 300 पासून 2000 पर्यंत असल्याने या कार्यक्रमाचे तिकीट परवडत नसल्याचे प्रेक्षकांकडून सांगण्यात आले. प्रेक्षकांना ते परवडत नसल्याने प्रेक्षकांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रेक्षक कार्यक्रमांकडे फिरकलेच नाही. व गौतमी पाटीलला (Gautami Patil) रिकाम्या खुर्च्या व अल्प प्रेक्षकांसमोर कलेचे सादरीकरण ( Presentation of art) करावं लागलं.

मोठी बातमी : कर्नाटकाचा तिढा सुटला, कोण होणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री?

गौतमीच्या कार्यक्रमाला गर्दी नसली तरी देखील कार्यक्रमांमध्ये हुल्लडबाजी सुरूच होती. त्यामुळे कार्यक्रम हा वारंवार बंद करावा लागत होता. शेवटी गौतमी पाटीलच्या सुरक्षारक्षकांनी कार्यक्रमातील प्रेक्षकांना चोप दिला.

Maternity Leave | खुशखबर ! महिलांच्या प्रसूती रजेत होणार वाढ ; नीती आयोगाने केली शिफारस

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *