Gautami Patil । ‘गौतमी पाटील’ आज प्रत्येक घराघरात पोहोचलेलं नाव आहे. संपूर्ण राज्यभरात तिचे असंख्य कार्यक्रम होतात. तिचा कार्यक्रम (Gautami Patil Event) म्हटला की हजारोंच्या संख्येने गर्दी होते. पण तिच्या प्रत्येक कार्यक्रमात गोंधळ आणि राडा झाल्याचे आपण पाहतो. त्यामुळे तिचा प्रत्येक कार्यक्रम पोलीस बंदोबस्तात पार पडतो. अशातच आता तिच्या कार्यक्रमात पुन्हा हुल्लडबाजांनी राडा केल्याचे समोर आले आहे. (Latest marathi news)
गौतमीचा लातूरच्या उदगीरमध्ये कार्यक्रम सुरु असताना काही तरुणांनी गोंधळ घातला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कार्यक्रमाला खूप गर्दी झाली होती. या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode), माजी आमदार सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao) आणि भाजपा जिल्हाध्यक्षांनी देखील हजेरी लावली होती. गर्दी जास्त असल्याने पाठीमागे बसलेल्या प्रेक्षकांना गौतमी दिसत नव्हती.
त्यामुळे त्यांनी दगड फेकून मारला. पण यामध्ये एकजण जखमी झाला. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. इतकेच नाही तर गौतमीचा कार्यक्रम पाहता यावा यासाठी काहींनी नेत्यांचे बॅनर फाडून टॉवरवर चढले. आयोजकांनी या तरुणांना खाली उरतण्यास सांगितले पण त्यांनी काही ऐकले नाही. त्यांनी कार्यक्रमात राडा देखील केला. यावेळी पोलिसांना नाइलाजाने गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला.