
Gautami Patil । प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यासाठी हिच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या चार दिवसापूर्वी तिचे वडील हे धुळ्यात सुरत हायवेवर बेवारस अवस्थेमध्ये आढळले होते. त्यांच्यावर धुळ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार होते. यानंतर रवींद्र पाटील यांचे फोटो सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल झाले यानंतर गौतमीनी तिच्या वडिलांची जबाबदारी स्वीकारली.
Maratha Reservation । मराठा आंदोलनासाठी स्वत:ची जमीन विकणारे मनोज जरांगे पाटील कोण आहेत? जाणून घ्या
गौतमीने वडिलांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांच निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. काही समाजकर्त्यांनी रवींद्र पाटील यांना धुळ्यातील रुग्णालयात दाखल करून होतं याबाबतची माहिती गौतमीला मिळताच तिने आपल्या वडिलांना पुण्यात नेलं आणि एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र त्यांची प्रकृती धुळ्यामध्ये जास्त बिघडली होती मात्र त्यांचे निधन झाल्याचं माहिती समोर आली आहे.
Agriculture News । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार कुकडीचे आवर्तन
दरम्यान, गौतमी तिच्या वडिलांपासून वेगळी पुण्यामध्ये आई सोबत राहत होती मात्र तिच्या वडिलांची तब्येत बिघडल्याची माहिती समजतात तिने माणूसकी म्हणून वडिलांना पुण्यामध्ये रुग्णालयात दाखल केल्याचे देखील सांगितले होते. पुण्यातील चिंतामणी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धनकवडी या ठिकाणच्या स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.