
मागच्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव सातत्याने चर्चेत आहे. गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) लावण्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावले आहे. महाराष्ट्रात गौतमीचे लाखो चाहते आहेत. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना मोठी मागणी असल्याचे आपल्याला दिसत आहे. तिच्या कार्यक्रमासाठी महिनाभर प्रतिक्षा करावी लागते तेव्हा कार्यक्रमाची तारीख मिळत आहे. यामध्येच आता गौतमी पाटीलचा नगर जिल्ह्यात झालेला एक कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
रोहित शर्माची संपत्ती वाचून तुमचेही फिरतील डोळे! महिन्याला कमावतो ऐवढे कोटी…
गौतमीच्या कार्यक्रमणात तरुणांची गर्दी होणं किंवा तरुणांनी राडा कारण हे काही नवीन नाही. मात्र यावेळी नगरमध्ये गौतमीचा कार्यक्रम चालू असताना एका तरुणाने गौतमी सारखा हुबेहूब डान्स केल्याचं समोर आले. याच दरम्यान मोठा राडा झाला होता. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गौतमीच्या कार्यक्रमात गर्दी आणि राडा हे समीकरण झाल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे.
धक्कादायक घटना! तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यु; 15 दिवसांपूर्वीच झाला होता साखरपुडा
तरुणाने स्टेजसमोरच गौतमी सारखा डान्स करण्याचा प्रयत्न करुन गौतमीला टक्कर दिली. त्याचबरोबर अनेक तरुण सेल्फीसाठी देखील स्टेज जवळ जाण्याच्या प्रयत्न करत होते. मात्र यासाठी पोलीसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे.
प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी! कल्याणी पाटीलला चितपट करून मिळवली गदा