
4संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटीलचे (Gautami Patil) चाहते आहेत. सध्या सगळीकडेच गौतमी पाटीलच्या डान्सची चलती आहे. गौतमी ज्या ज्या ठिकाणी नृत्य करायला जाते त्या ठिकाणी गर्दी ही होतेच. इतकंच नाही तर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात बसायलाही जागा नसते. यामुळे लोक मिळेल त्या जागेत धन्यता मानून कार्यक्रम बघतात. गौतमीच्या बऱ्याच कार्यक्रमांना झालेली गर्दी आवरणे पोलिसांना देखील कठीण जाते. दरम्यान गौतमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने चक्क बैलासमोर डान्स केला आहे. (Viral video of Gautami Patil)
अतिक अहमदकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती! कोण होणार या मालमत्तेचा वारस?
मुळशी ( Mulashi) येथील एका कार्यक्रमात सुनील हगवणे युवा मंचने गौतमी पाटीलला बोलावले होते. यासाठी प्रचंड मोठ्या आणि सुटसुटीत मैदानात स्टेज बांधले होते. या स्टेजवर गौतमी चक्क एका बैलासमोर नाचली. महत्त्वाची बाब म्हणजे इतर कार्यक्रमांप्रमाणेच गौतमीने याठिकाणी लचकत मुरडत डान्स केला. ज्या बैलासमोर गौतमी बेभान होऊन नाचली त्या बैलाचे नाव आहे बावऱ्या ! तब्बल दोन तास गौतमी पाटील बावऱ्या समोर नाचत होती.
Urfi Javed: उर्फी जावेदने कॅमेऱ्यासमोर ओलांडल्या सर्व मर्यादा, नको तेच झालं शूट अन्… Video व्हायरल
या बैलाच्या पाठोपाठ गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक उपस्थित होते. खरंतर बावऱ्या हा एक शर्यतीचा बैल आहे. मानाचा बैल म्हणून या बैलाला ओळखले जाते. हा गावचा सर्वात लाडका बैल असून सर्व लोक त्याचे लाड करतात. गावाची शान असणाऱ्या या बैलासाठी खास गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. ( Viral Video)
ट्रेनचं तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी करा ‘या’ पद्धतीचा वापर; जाणून घ्या सविस्तर…