Gautami Patil | छोट्या पुढारीवर भडकली गौतमी पाटील; म्हणाली, “मी काय महाराष्ट्राचा…”

Gautami Patil Gautami Patil got angry at the small leader; She said, "Am I from Maharashtra..."

गौतमी पाटील ( Gautami Patil) आणि गर्दी हे समीकरण आता सर्वांसाठीच सवयीचे झाले आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी यात्रा व समारंभांच्या निमित्ताने गौतमी पाटीलचे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांना अगदी हाऊसफुल्ल गर्दी होते. परंतु याच गर्दीमुळे गौतमी पाटीलला अनेक वादांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान छोटा पुढारी ( Chhota Pudhari) म्हणून ओळखला जाणारा घनश्याम दराडे ( Ghanshyam Darade) याने केलेल्या व्यक्तव्यामुळे गौतमी पाटील सध्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधत गौतमीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसणार? पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांनी घेतली ठाकरे गटाच्या माजी आमदाराची भेट; चर्चांना उधाण

मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी मागेच सोडून दिल्या आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटीलच दिसते का? बाकी इतर महिला दिसत नाहीत का? एकदा माझा कार्यक्रम पाहा आणि मगच त्यावर आक्षेप घ्या. मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का दादा? असा प्रश्न गौतमी पाटीलने छोटा पुढारी घनश्याम दराडे याच्यासमोर उपस्थित केला आहे.

सर्वात मोठी बातमी! आदित्य ठाकरे राजीनामा द्यायला तयार, नेमकं काय आहे प्रकरण?

तसेच नाशिकमधल्या ( Nashik) कार्यक्रमात पत्रकारांना झालेल्या धक्काबुक्कीच्या प्रकरणावर सुद्धा गौतमी पाटीलने वक्तव्य केले आहे. “पत्रकारांना धक्काबुक्की होणे चुकीचे आहे. अशा गोष्टींचा निषेध केला पाहिजे. मी कार्यक्रमातून निघाले आणि अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यानंतर मला या प्रकरणाबाबत कळले. वाद घालू नका. कार्यक्रम एन्जॉय करा. कुणाला मारहाण करू नका, असं आवाहनही मी त्यावेळी केलं होतं. ” असे गौतमी पाटील यावेळी म्हणाली आहे.

मोठी बातमी! मंत्रिपदासाठी राजकीय वर्तुळात रंगली या’12 नावांची चर्चा!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *