
‘सबसे कातील गौतमी पाटील’ ने अगदी कमी काळात प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. तिच्यावर अनेक टीका आणि आरोप झाले. मात्र तिने धीराने आणि संयमाने सर्व गोष्टींचा सामना केला. कितीही संकटे आली तरी तिने नाचायचे सोडले नाही. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटीलचे ( Gautami Patil Fans) चाहते आहेत. गावागावांत जत्रा, सण समारंभाच्या निमित्ताने गौतमी पाटीलचे कार्यक्रम होतात. लोकांना उभे राहता येत नाही इतकी गर्दी गौतमीच्या कार्यक्रमांना असते. या गर्दीमुळे गौतमी अनेकदा वादात देखील अडकली आहे. ( New debate on gautami patil )
पत्नीने पतीला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले, अन्… व्हिडीओ पाहून बसेल धक्का
दरम्यान सध्या गौतमी पाटील गर्दीवरून नाही तर तिच्या आडनावावरून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पुण्यामध्ये गौतमीच्या आडणावरून एक बैठक पार पडली. यामध्ये गौतमी पाटीलचे खरे आडनाव ‘पाटील’ नसून ‘चाबुकस्वार’ असल्याचे समोर आले आहे. ‘पाटील’ आडनाव लावून गौतमी मराठा समाजाची बदनामी करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.
गौतमीने ‘पाटील’ आडनाव लावू नये, अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही. असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी दिला आहे. यामुळे गौतमी पाटीलच्या आडनावावरून नवीन वाद उभा राहिल्याचे पहायला मिळत आहे. परंतु, गौतमी पाटीलने यावर अजून कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे हा वाद आता कोणते नवीन वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात ४ नव्हे, तर ८ टक्क्यांनी झाली वाढ