महाराष्ट्रामध्ये सध्या गौतमी पाटील (Gautami Patil) खूप चर्चेत आहे. मागच्या काही दिवसापासून तिच्यावर काही लावणी कलाकार (lavni artist) टीका देखील करत आहे. तिच्यावर मागच्या काही दिवसापूर्वी अश्लील नृत्य (obscene dance) केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. यामुळे गौतमीचे कार्यक्रम बंद व्हावेत अशी मागणी होत आहे. पण त्याचबरोबर गौतमीच्या कार्यक्रमांना देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मात्र गौतमीच्या कार्यक्रमांमुळे पारंपारिक तमाशा (tamasha) आणि लावणीचे (Lavni) कार्यक्रम मागे पडताना दिसतायेत. (gautami Patil Video)
Tarek Fateh: मोठी बातमी! पाकिस्तानी लेखक तारेक फतेह यांचं दुःखद निधन
तमाशा कलावंत म्हणतात की, कोणत्याही कार्यक्रमात गेले की प्रेक्षकांची एकच मागणी असते. ती म्हणजे, गौतमी पाटील जसा डान्स आणि हावभाव करते तसंच तुम्ही देखील करा, अशी मागणी प्रेक्षक करत आहेत. त्यामुळे तमाशा कलावंत हैराण झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लोकांच्या या मागणीमुळे तमाशा कलाकार वैतागले असून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Sharad Pawar: महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही? शरद पवारांच्या त्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात संभ्रम
सर्वजण गौतमी पाटीलचे आम्हाला व्हिडीओ दाखवतात आणि तशाप्रकारे डान्स करण्याची मागणी करतात याचे आम्हाला दुःख होते. लोकांना गण गवळण, बतावणी, विनोद असे कार्यक्रम पटत नाहीत तर त्यांना तोकड्या कपड्यातील डान्स हवा या अशा प्रकारच्या मागण्यांमुळेच तमाशा लोप पावत आहे. असं म्हणत तमाशा कलावंतांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कराडमधील तरुणाने ड्रीम ११ मध्ये जिंकले १ कोटी २० लाख रुपये; आई वडील भावुक होत म्हणाले…
याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना वसंतराव नांदवळकर (Vasantrao Nandvalkar) यांच्या तमाशा कलावंतांनी खंत व्यक्त केली आहे. प्रेक्षकांना फक्त गौतमी पाटील सारखा डान्स पाहिजे हा प्रकार जर असाच चालू राहिला तर तमाशा हा तमाशा राहणार नाही तर ऑर्केस्ट्रा होईल, असे या कलाकारांनी म्हटलं आहे.