गौतमी पाटील ( Gautami Patil) हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. राज्यात सर्वत्र गौतमी पाटीलचे कार्यक्रम होत असतात. तिच्या नृत्याची सगळीकडे चर्चा असते. अनेकदा तिच्यावर गंभीर आरोप देखील होतात. मात्र तरी सुद्धा ती तेवढ्याच आत्मविश्वासाने आपले कार्यक्रम करत आहे. मध्यंतरी गौतमी पाटीलवर एक मोठे संकट कोसळले होते. तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ( Viral Video of Gautami Patil)
Sharad pawar | लवकरचं निर्णय होणार! शरद पवारांचे सूचक वक्तव्य; म्हणाले, “दोन दिवसांत…”
यावेळी अनेक लोकांनी गौतमीला न्याय मिळावा अशी मागणी केली होती. एवढेच नाही तर राजकीय वर्तुळातून सुद्धा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर पकडण्यात यावे, असे वक्तव्य करण्यात आले होते. याप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांपैकी एका मुलाला पुणे पोलिसांनी पकडले आहे.
चोर तो चोर वरून शिरजोर! वाहतूक पोलिसांनी कारवाई केली म्हणून चालकाने भर रस्त्यात पेटवली दुचाकी
यापार्श्वभूमीवर गौतमी पाटीलने माध्यमांना आपली प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केले आहे. व्हायरल व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी ज्या मुलाला अटक केली आहे तो अल्पवयीन आहे. त्याचे वय फक्त १७ वर्षे इतके आहे. ज्या मुलाने व्हिडीओ व्हायरल केला, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मला खूप मदत केली आहे. मी त्यांचे आभार मानते. अजून दोघे-तिघे आहेत. लवकरच त्यांनाही पकडले जाईल. बरं वाटलं आज किमान कुणीतरी एक सापडला आहे.