Gautami Patil । मागच्या काही दिवसापासून गौतमी पाटील हे नाव सोशल मीडियावर कायम चर्चेत आहे. अगदी कमी वेळामध्ये गौतमीने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. अनेक ठिकाणी गौतमीचे कार्यक्रम होत आहेत. दहीहंडी उत्सव, गणेश उत्सव, वाढदिवस अशा अनेक उत्सवानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम आणि हुल्लडबाजी हे समीकरण आता काही नवीन नाही, गौतमीच्या कार्यक्रमात सतत गोंधळ होत असतो.
Amravati News । धक्कादायक! वेळेत उपचार न केल्याने डॉक्टर-पेशंटमध्ये तुफान हाणामारी
आता पुन्हा एकदा नागपूर मध्ये गौतमीच्या कार्यक्रमात तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमात अनेक खुर्च्या तुटल्या त्यामुळे हुल्लडबाज तरुणांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला आहे. नागपूरच्या हिल टॉप परिसरामध्ये एकता गणेशोत्सव मंडळाने शुक्रवारी गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी गौतमी कार्यक्रमासाठी जवळपास दोन तास उशिरा पोहोचली त्यानंतर तिचं नृत्य सुरू झालं आणि तरुणांनी मोठा गोंधळ करायला सुरुवात केली.
Pankaja Munde । पंकजा मुंडे यांनी सांगितला मुंबईमधील धक्कादायक अनुभव!
बरेच तरुण त्या ठिकाणी लावलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्यांवर उभे झाले. त्यामुळे मोठ्या संख्येने प्लास्टिकच्या खुर्च्या तुटल्या काही हुल्लडबाज तुटलेल्या खुर्च्यांचे तुकडे देखील हवेत फिरकावत होते. त्यानंतर हळूहळू सर्वजण खुर्च्यांवर उभा राहू लागले गर्दी वाढू लागली आणि या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला आहे.
Sharad Pawar News । रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई, शरद पवारांनी सोडले मौन, म्हणाले…