
महाराष्ट्रात गौतमी पाटीलला ( Gautami Patil) ओळखत नाही, असे कोणी शोधूनही सापडणार नाही. मागच्या काही दिवसांत लावणी कलाकार म्हणून गौतमी पाटील प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. दरम्यान लावणीमध्ये अश्लील हालचाली करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात केला जात होता. त्यावर गौतमीने माफी मागितली होती. आता गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
‘हेरा फेरी ३’च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! राजुच्या भूमिकेत कार्तिक
गौतमी पाटील सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या कार्यक्रमाविषयी माहिती देत असते. गौतमीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत. यादरम्यान आता गौतमीने इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गौतमी पाटीलचा ‘खान्देश कन्या’ म्हणून गौरव करण्यात आला आहे. गौतमी पाटीलला हा पुरस्कार माजी मंत्री आणि भाजप नेते जयकुमार रावल यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
इंस्टाग्रामवर वाढवायचे आहेत लाखो फॉलोवर्स? आजच फॉलो करा ‘या’
पोस्ट करताना कॅप्शनमध्ये गौतमीने लिहिले की, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते माझा खान्देशी कन्या म्हणून गौरव करून सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. असाच मायेचा हात सदैव माझ्या पाठी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना… जय खान्देशी! या पोस्टवर नेटकरी आपली प्रतिक्रिया देत आहेत. तर काही नेटकरी गौतमीला ट्रोल करत आहेत.