गौतमी पाटील अल्पावधीतच अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. विविध ठिकाणी होत असलेल्या तिच्या कार्यक्रमांना देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मध्यंतरी तिचा कपडे बदलतानाचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. अशातच मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव पाटील यांनी आता गौतमी पाटीलला धारेवर धरले आहे. त्यांनी गौतमी पाटीलची तुलना पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्रीशी केली आहे.
मोदींविरोधात पोस्टर लावणे पडले महागात; ६ जणांना झाली अटक
महाराष्ट्रात आजपर्यंत अशा भरपूर गौतमी पाटील ( Gautami Patil) आल्या. परंतु आजही तमाशा चिरतरुण राहिला आहे. काहीही झाले तरी तमाशा ही लोकनाट्य कला अजूनही जिवंत आहे. ज्या प्रमाणे वारकरी विठ्ठलाला भेटायला पंढरपूरला जातात, अगदी तसंच तमाशा पंढरी असलेल्या नारायणगावात ( Narayangaon) लोक तमाशा पाहण्यासाठी येतात.
13 वर्षाची मुलगी बनली ऑडी क्यू 3 ची मालकीण; गाडीची किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
लोककलेची ही जुनी परंपरा अनेक दिग्गजांपासून चालत आलेली आहे. ती आजसुद्धा तितकीच चिरतरुण आहे. यामध्ये कधीही खंड पडणार नाही. गौतमी पाटील ही हंगामी आहे. ती ही गावोगावी पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्रीसारखी आहे. अशा शब्दांत तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजी जाधव पाटील यांनी गौतमी पाटीलला फटकारले आहे.
गुढीपाडव्याला सर्वसामान्यांसाठी हापूस आंबा स्वस्त मात्र उत्पादकांची परवड!