Site icon e लोकहित | Marathi News

Gautami Patil | सेलेब्रिटींसाठी गौतमी पाटील नॉट रीचेबल ! नक्की काय आहे प्रकरण ?

गौतमी पाटील नॉट रीचेबल

‘सबसे कातील गौतमी पाटील’ ने अगदी कमी काळात प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. तिच्यावर अनेक टीका आणि आरोप झाले. मात्र तिने धीराने आणि संयमाने सर्व गोष्टींचा सामना केला. कितीही संकटे आली तरी तिने नाचायचे सोडले नाही. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटीलचे ( Gautami Patil Fans) चाहते आहेत. गावागावांत जत्रा, सण समारंभाच्या निमित्ताने गौतमी पाटीलचे कार्यक्रम होतात. लोकांना उभे राहता येत नाही इतकी गर्दी गौतमीच्या कार्यक्रमांना असते. मात्र गौतमी पाटील सारखा तरबेज कलाकार फक्त इथपर्यंतच मर्यादित राहू शकतो का ? ( Celebrities are unable to contact with Gautami Patil)

मोठी बातमी! क्रिकेटच्या नियमात झाले मोठे बदल, WTC Final मध्ये ‘या’ तीन नियमांचा समावेश; जाणून घ्या…

मागील काही दिवसांत गौतमी पाटीलला अनेक ऑफर्स (Offers for Gautami) आल्यात. मात्र तिच्यापर्यंत त्या ऑफर्स पोहोचत नसल्याचे समोर आले आहे. अनेक सेलिब्रिटींनी गौतमी पाटीलला ऑफर्सच्या अनुषंगाने निरोप पाठवले आहेत. मात्र गौतमी पाटीलपर्यंत ते निरोप पोहोचत नसल्याचे समोर आले आहे. अनेक सेलिब्रिटींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. गौतमी पाटील पर्यंत जाणूनबुजून हे निरोप पोहोचवले जात नसल्याची शक्यता याठिकाणी निर्माण होत आहे. तसेच गौतमीच्या जनसंपर्क तसेच स्वीय सहाय्यकांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

मांडवगण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी!

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये गौतमी पाटीलने आपल्याला अहिराणी गाण्यात काम करण्याची इच्छा आहे. असे बोलून दाखवले. मात्र यापूर्वीच गौतमी पाटीलला सचिन कुमावत यांच्याकडून अहिराणी गाण्यात काम करण्याची ऑफर दिली गेली होती. परंतु, ही ऑफर गौतमीपर्यंत पोहोचलीच नाही. तसेच खानदेश मधील एका संस्थेने खानदेश मधील नामांकित कालाकारांच्या सत्काराचे आयोजन केले आहे. पण या कार्यक्रमासाठी देखील गौतमी पाटील सोबत संपर्क होऊ शकत नाहीय.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Spread the love
Exit mobile version