
गौतमी पाटीलला ( Gautami Patil) ओळखत नाही. असा माणूस अवघ्या महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. खूप कमी काळात गौतमीने प्रसिद्धी मिळवली आहे. राज्यातील विविध छोट्या-मोठ्या गावांत गौतमी पाटीलचे कार्यक्रम होत असतात. यात्रांच्या व समारंभांच्या निमित्ताने गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित केले जातात. दरम्यान गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणे एका आयोजकाला ( Manager) चांगलेच महागात पडले आहे.
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपधविधी, कोणी केला मोठा दावा?
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर तिचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शासकीय कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते. राजेंद्र भगवान गायकवाड ( महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष, प्रजाशक्ती पार्टी, रा. आगळगाव रोड ) यांच्यावर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
फक्त नऊ दिवसांत The Kerala Story ने कमावले ‘इतके’ कोटी रुपये; ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
राजेंद्र गायकवाड यांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. दरम्यान कार्यक्रमामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गायकवाड यांना पोलिसांनी काही शासकीय मंजुरी आणायला सांगितल्या होत्या. मात्र या मंजुरी न आणताच राजेंद्र गायकवाड यांनी कार्यक्रम आयोजित केला. यामुळे त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे.