महाराष्ट्रात गौतमी पाटीलला (Gautami Patil) ओळखत नाही, असे कोणी शोधूनही सापडणार नाही. मागच्या काही दिवसांत लावणी कलाकार म्हणून गौतमी पाटील प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. दरम्यान लावणीमध्ये अश्लील हालचाली करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात केला जातोय. याशिवाय गौतमीच्या कार्यक्रमात चुकीच्या घटना वारंवार घडत असल्याने तिचे कार्यक्रम बंद करण्यात यावेत अशी मागणी विविध संघटना व लावणी कलाकारांकडून सतत करण्यात येत आहे.
अन् महिलेने गाडीवरून मारली उडी! रॅपिडो ड्रायव्हरने महिलेसोबत केले गैरवर्तन
गौतमी विविध युट्युब चॅनेल्सला मुलाखती देत आहे. यामध्ये ती तिच्या जीवनामधील अनेक गोष्टींचा खुलासा देखील करत आहे. गौतमीने मागच्या काही दिवसापूर्वी एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली यावेळी तिने अनेक मोठे खुलासे केले आहेत. यावेळी गौतमीला तिच्या वडिलांबद्दल विचारले असता गौतमी म्हणाले ज्यावेळी माझे वडील पहिल्यांदा माझ्यासमोर आले त्यावेळी मी त्यांना ओळखत नव्हते. मला ते माझे वडील आहेत हे देखील माहित नव्हते असं गौतमी यावेळी म्हणाली आहे.
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अमेरिकन लेखिकेने केला लैंगिक शोषणाचा आरोप
गौतमीच्या या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर तिची ही युटूबवरील मुलखात देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, गौतमने अगदी खूप कमी वेळामध्ये प्रसिद्धी मिळवली आहे.
शरद पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा; राजकीय घडामोडींना वेग