Gautami Patil । डान्सर गौतमी पाटील ही सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या डान्समुळे तर अनेक वेळा तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या देखील तिने तिच्या डान्सचा एक व्हिडिओ स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. मात्र यावेळी या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करून तिला चांगलच ट्रोल केलं आहे.
गौतमीने ‘दिलदार मनाचा रुबाबदार’ या गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडिओ स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत तीन लहान मुली देखील या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गौतमी जशी डान्स करते तशाच त्या मुली डान्स करताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी गौतमीवर चांगलीच टीका केली आहे.
Amol Kolhe । “…त्यावेळी अमोल कोल्हे भेकडासारखे पळून गेले होते” अजित पवार गटाच्या नेत्याची टीका
‘तू नाचलीच बास झालं बाकीच्या मुलींना नको हे करायला लावू’ अशी कमेंट एका युजरने केली आहे त्याचबरोबर, ‘तू नाच आणि अजून तुझ्यापुढे दहा तयार कर…’ असं देखील दुसरा युजर म्हणाला आहे. ‘काय जरा तरी लाजाव की देशाचे भविष्य नाचवताना’ अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट करत लोक गौतमी पाटील हिला ट्रोल करत आहेत.