
विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) नेहमीच आपल्या रोखठोक भूमिकेमुळे चर्चेत असतात. तसेच त्यांच्याकडे मिश्किल बोलण्याची देखील विशेष शैली आहे. दरम्यान पुण्यात नुकतीच गौतमी पाटील एका बैलासमोर नाचल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर लोकांच्या विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आपल्या विशेष शैलीत वक्तव्य केले आहे. ( Ajit pawar’s statement on Gautami patil’s dance)
जगातील सर्वात महाग ट्रॅक्टर बद्दल तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या अधिक..
गौतमी पाटील (Gautami Patil) बैलासमोर नाचेल किंवा आणखी कोणासमोर नाचेल, तुला काय त्रास आहे? तीच काम आहे ती करणार. ज्या बैलासमोर ती नाचली. तो बैलगाडा शर्यतीत पहिला आलेला बैल आहे. त्या बैलासाठीच तो कार्यक्रम घेण्यात आला होता. यामुळेच तिनेही नाचण्यास होकार दिला असेल. त्यामुळे कोणाला त्रास होण्याचे कारण नाही. असं अजित पवार म्हणाले आहेत.
calls : कॉल्स आणि SMS मध्ये होणार हे बदल, १ मे पासून येणार नवीन नियम…
सध्या बऱ्याच ठिकाणी भावी मुख्यमंत्री ( Future chief minister of Maharashtra) म्हणून अजित पवारांचे बॅनर लागले आहेत. यावर बोलताना अजित पवारांनी आपल्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना फटकारले आहे. बॅनर लावल्याने कोणी मुख्यमंत्री होत नाही. माझे बॅनर लावू नका. १४५ची मॅजिक फिगर लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्कल लढवून ती मिळवली आणि आता ते मुख्यमंत्री आहेत. यामुळे कसल्याही प्रकारची बॅनरबाजी करू नका. असे अजित पवार म्हणाले आहेत.
जगातील सर्वात महाग ट्रॅक्टर बद्दल तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या अधिक..