Gautami Patil । अगदी कमी वेळात गौतमी पाटीलने (Gautami Patil) महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. गौतमीवर कितीही आरोप झाले तरीही, तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या चाहत्यांच्या गर्दीमुळे गौतमी पाटील कित्येकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमीचे महाराष्ट्रात जबरदस्त फॅन फॉलोविंग आहेत. गौतमीचा डान्स आणि वाद हे काही नवीन नाही.
Ganpat Gaikwad । मोठी बातमी! आमदार गणपत गायकवाड यांनी केला अन्नत्याग
‘सबसे कातील गौतमी पाटील’ ने अगदी कमी काळात प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. तिच्यावर अनेक टीका आणि आरोप झाले. मात्र तिने धीराने आणि संयमाने सर्व गोष्टींचा सामना केला. कितीही संकटे आली तरी तिने नाचायचे सोडले नाही. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटीलचे ( Gautami Patil Fans) चाहते आहेत. गावागावांत जत्रा, सण समारंभाच्या निमित्ताने गौतमी पाटीलचे कार्यक्रम होतात. सध्या देखील लातूरच्या उदगीर या ठिकाणी गौतमीचा कार्यक्रम झाला.
गौतमीच्या कार्यक्रमांना तरुणांचा नेहमीच गोंधळ पाहायला मिळतो. मात्र यावेळी गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांसोबत तरुणीने देखील गौतमीला पाहण्यासाठी गोंधळ घातला. यावेळी महिलांमध्ये हाणामारी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. सध्या याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Mahesh Gaikwad । ICU मध्ये उपचार सुरू, प्रकृती चिंताजनक; तरीही महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
माहितीनुसार लातूरच्या उदगीर या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमल्याने अनेक महिलांना बसण्यासाठी जागा मिळाली नाही. यामध्येच बसण्याच्या जागेवरून काही महिलांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत या भांडण करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतलं आणि चोप दिल्याचं सांगण्यात येत आहे.