गौतमी पाटीलला ओळखत नाही, असा माणूस महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. गौतमीचे महाराष्ट्रभर चाहते आहेत. तिच्या कार्यक्रमांना लोकांना बसायला जागा उरत नाही एवढी गर्दी असते. अनेकदा बदनामी झाली, लोकांनी टीका केली परंतु तरी देखील गौतमी पाटीलने ( Gautami Patil) नाचायचे सोडले नाही. नुकताच तिचा बैलासमोर नाचतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान अजित पवार ( Ajit Pawar) यांनी देखील या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर मिश्किल वक्तव्य केले होते.
तुम्हीही Swiggy वरून ऑनलाईन जेवण मागवताय? तर मग ही बातमी तुमच्यासाठी…
गौतमी पाटीलने बैलासमोर नृत्य केले, त्याचा तुला काय त्रास आहे. ती तिचं काम करत आहे. तुम्हाला काय अडचण आहे? असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला होता. यावरून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अजित पवार यांना आता टोला मारला आहे. एकंदरीत काय तर ‘गौतमी पाटील’ हा विषय आता राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चिला जात आहे. ” ज्या लोकांचे वय डोळे मारायचे आहे, ते डोळे मारतात! ज्यांनी लहानपणी डोळे मारले नाहीत, ते लोक आता डोळे मारत आहेत,” असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी अजित पवारांना चिमटा काढला आहे. ( Abdul Sattar Gives statement on Gautami Patil)
गुलाबजाम घरी घेऊन जाण्यावरून लग्नात नातेवाईकांमध्ये वाद; झाली तुफान मारामारी
तुम्ही गौतमी पाटीलला ओळखता का ? असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला असता, अब्दुल सत्तार म्हणाले की, कृषी मोहोत्सवात गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. आता पुन्हा एकदा ठेऊ आणि त्या कार्यक्रमाला अजित पवारांना बोलवू. याशिवाय अजितदादा मेरे दोस्त है. गलतीया तो सबसे होती है. हमारी दोस्ती है! अब्दुल सत्तार की छप जाती है, अजित पवार की छुप जाती है, असं सुद्धा अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले आहेत.
Uorfi Jawed: उर्फी जावेदची संपत्ती ऐकून बसेल धक्का; महिन्याला कमावते इतके रुपये