Site icon e लोकहित | Marathi News

गौतमी पाटीलचे लोकांना भावनिक आवाहन; म्हणाली, “माझे कार्यक्रम बंद करू नका, माझी…”

Gautami Patil's emotional appeal to the people; Said, "Don't stop my show, my..."

लावणी म्हंटल की आजकाल लोकांना फक्त गौतमी पाटील आठवते. कारण, मागील काही दिवसांपासून राज्यात गौतमी पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे. लावणीच्या नावाखाली अश्लील हावभाव व हातवारे केल्याचा आरोप गौतमी पाटील वर होतोय तसेच तिच्या लावणीच्या कार्यक्रमांमध्ये गर्दी होऊन मागील काही दिवसांपासून चुकीच्या घटना घडत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षांनी व संघटनांनी तिच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी आणावी अशी मागणी केली होती.

हरियाणा सरकारकडून राहुल गांधी यांच्या टीशर्ट वरून अजब टीका; भारत जोडो यात्रा थांबण्यासाठी लिहिले ‘हे’ पत्र

या पार्श्वभूमीवर गौतमी पाटीलने आपली प्रतिक्रिया दिली आहे. काहीही झालं तरी मी माझी लावणी बंद करणार नसून लोकांना माझ्या लावणीचे कार्यक्रम आवडतात. त्यांचे माझ्या लावणीवर प्रेम आहे. त्यामुळे मी लावणी करत राहीन असे म्हणत आपले लावणीचे कार्यक्रम बंद करणार नाही अशी माहिती गौतमी पाटीलने दिली आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कोचर दांम्पत्याला सीबीआय कडून अटक

यावर सविस्तर बोलत गौतमी पाटील ( Gautami Patil) म्हणाली की, मागील काही दिवसांपासून मी बघत आहे की, काही लोक माझ्या लावणीवर बंदी घालण्याची मागणी करत आहे. परंतु, मी माझी लावणी बंद होऊ देणार नाही. माझ्या लावणीचे कार्यक्रम लोकांना खुप आवडतात आणि त्यांचे माझ्यावर खुप प्रेम आहे. मधल्या काळात माझ्याकडून चुका झाल्या असतील. मात्र मी त्यांची माफी मागितली आहे. लोकांनी माझासुद्धा विचार करावा. माझी काळजी कोणी करणार आहे की नाही? असे सांगत गौतमीने लोकांना भावनिक आवाहन केले आहे.

“…तर संजय राऊत शरद पवारांच्या मांडीवर बसलेले असतील”; शिंदे गटातील आमदाराकडून गौप्यस्फोट

Spread the love
Exit mobile version