मागील दोन चार दिवसांपासून गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. गौतमी पाटील चेंजिंग रूम मध्ये कपडे बदलत असतानाचा तो व्हिडीओ असून या आक्षेपार्ह व्हिडीओ मुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली असून गुन्हेगार अद्याप पकडण्यात आलेला नाही. दरम्यान या प्रकरणावर गौतमीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र काल एका कार्यक्रमावेळी माध्यमांशी बोलताना गौतमीने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांनीच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, चंद्रशेखर बावनकुळे यांची जोरदार टीका
माध्यमांशी संवाद साधताना गौतमी पाटील म्हणाली, “मला प्रेक्षकांनी पहिल्यापासून खूप प्रेम दिली अजून देखील प्रेक्षक मला खूप प्रेम देतात. त्यामुळे मला खूप छान वाटतंय . माझी बोलण्याची मनस्थिती नाही तरी देखील मी तुमच्यासमोर आली आहे. मला लोकांची साथ आहे या गोष्टीचा खूप अभिमान आहे. यामुळे खूप छान वाटतंय.” असं गौतमी म्हणाली आहे.
दहावीच्या पेपरला शिक्षकांनी लिहिली थेट फळ्यावर उत्तरे! सामूहिक कॉपीचा गैरप्रकार उघडकीस
त्याचबरोबर एका पत्रकाराने कपडे बदलताना व्हिडीओ व्हायरल झाला यावर प्रश्न विचारला असता गौतमी म्हणाली “त्याबाबत कायदेशीर कारवाई सुरू आहे. माझी पोलिसांकडे काहीही मागणी त्यामुळे या विषयावर मी काहीही बोलू शकत नाही. अशा शब्दात तिने प्रतिक्रिया दिली आहे.
“अधिवेशन संपले की हे सरकार शेतकऱ्यांची वीज तोडणार “, राष्ट्रवादीच्या नेत्याचा सरकारवर हल्लाबोल