मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे. लावणीमध्ये अश्लील हालचाली करत असल्याचा आरोप गौतमी पाटील ( Gautami Patil) वर करण्यात येतोय. तसेच महाराष्ट्रभर होत असलेल्या गौतमीच्या लावणी कार्यक्रमात दंगा किंवा चुकीच्या घटना घडत आहे. यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. दरम्यान गौतमी पाटील हिच्या लावणी कार्यक्रमांवर संपूर्ण महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विकास सेनेने केली आहे. राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.
कोयता गँगची दहशत मोडीत काढा; अजित पवारांचे ट्विट चर्चेत, अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित केला
मिरज तालुक्यातील बेडग येथे झालेल्या गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात मिरज दत्तात्रय ओमासे या व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या व्यक्तीच्या मृत्यूस गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे गौतमी पाटील हिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. अश्लील नृत्य करत महाराष्ट्रातील लावणी परंपरेला आणि संस्कृतीला गौतमी पाटील मुळे छेद पडत आहे. तिच्या नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या ( social media) माध्यमातून घराघरात पोहोचतात. यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा लागत आहे.
बहिरोबावाडीच्या सरपंचपदी कोमल शरद यादव विजयी
याआधी देखील मनसे चे कार्यकारिणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी, गौतमीवर कारवाई करा असे सांगणारे पत्र मुंबई पोलीस महासंचालकांना लिहिले आहे. यामध्ये त्यांनी गौतमीवर IPC कलम 509 नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. गौतमीच्या नुकत्याच बीड येथे झालेल्या कार्यक्रमात देखील चाहत्यांनी स्टेज वर येऊन राडा घातल्याची घटना घडली होती.