गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या नृत्यावरून तर कधी तिच्यावर टीका केल्यामुळे ती चर्चेत असते. लोक तिला पाहण्यासाठी कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकतात, या गोष्टींवरून देखील तिच्यावरच टीका केली जाते. व त्याचा संबंध राजकारणाशी देखील जोडला जातो. सोशल मीडियावर गौतमी प्रचंड सक्रिय असते. दरम्यान तिने तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मागच्या काही दिवसांमध्ये तिच्या आई-वडिलांवरून आणि आडनावावरून ती खूप चर्चेत आली होती.
गौतमीने शेअर केलेला या फोटोमध्ये पहिल्यांदाच तिची आई पाहायला मिळत आहे. आणि त्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की गौतमी अगदी तिच्या आई सारखीच दिसते. गौतमीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केलेला आहे. हे अकाउंट गौतमीच ऑफिशियल अकाउंट असून या अकाउंटला 8 लाखांपेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत. पोस्ट केलेल्या या फोटोला गौतमीने “माझं जग, माझी आई आणि मी ” असे कॅप्शन दिले आहे.
भाजपाला राजकारणासाठी औरंगजेब हवा आहे, संजय राऊत यांची जोरदार टीका
गौतमीने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, गौतमीच्या जन्माआधीच तिची आई आणि वडील वेगळे झाले होते. गौतमी इयत्ता आठवीमध्ये असताना तिने पहिल्यांदा तिच्या वडिलांना पाहिलं. असा मन भरून येणारा गौतमीचा प्रवास आहे. असेही, तिने सांगितले होते. त्यात तिने पोस्ट केलेला हा फोटो चाहत्यांचे आकर्षणस्थान बनला आहे. त्या फोटोला चाहात्यांनी खूप कमेंट केल्या आहेत. त्यातील एक कमेंट अशीय की, “गौतमी तू हुबेहूब तुझ्या आईची कार्बन कॉपीच दिसतेस” असं त्या कमेंटमध्ये म्हटलेले आहे.
नाद करा पण आमचा कुठं! शेतकरी कुटुंबातील मुलाने लग्नाला वऱ्हाड थेट बैलगाडीनं नेलं…