मागील अनेक महिन्यांपासून सगळीकडे गौतमी पाटीलची चर्चा सुरू आहे. लावणी करताना अश्लील हातवारे केल्याचा आरोप तिच्यावर केला जात होता. इतकंच नाही तर महाराष्ट्रात गौतमी पाटीलचे कार्यक्रम बंद व्हावेत अशीही मागणी करण्यात आली होती. दरम्यान गौतमी पाटिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये ती कपडे बदलताना दिसत असून याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. आता या प्रकरणाची थेट राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.
गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या ३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल
याबाबत रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.”
एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 26, 2023
३/३
“…त्यामुळे अजित पवार यांच्या पोटात फार दुखत आहे”, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
त्याचबरोबर त्यांनी पुढे लिहिले की, “एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील.”