महाराष्ट्रात खेड्यापासून शहरापर्यंत गौतमी पाटीलचे चाहते आहेत. मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तिच्या डान्सच्या व्हिडिओला लोकांकडून मोठी पसंती मिळत आहे. गौतमी पाटीलच्या ( Gautami Patil) कार्यक्रमात होणारे दंगे, लावणीच्या नावाखाली अश्लील हालचाली केल्याचा आरोप व कार्यक्रम बंद करण्यासाठी महाराष्ट्रातील संघटनांकडून होत असलेली मागणी यामुळे गौतमी पाटील अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
समुद्र किनाऱ्यावर घडली धक्कादायक घटना; सहलीला गेलेले चार विद्यार्थी बुडाले
एवढंच नाही तर मध्यंतरी चेंजिंग रूम मध्ये गौतमी पाटील कपडे बदलत असतानाचा व्हिडीओ ( Viral Video) देखील व्हायरल करण्यात आला होता. यावरून राज्यात मोठी खळबळ माजली होती. दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याप्रकरणी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती.
“हिंदूंच्या घरामध्ये जर दोन मुल असतील तर त्यातील एकाला…” बागेश्वर बाबांचे मोठे वक्तव्य
दरम्यान गौतमी पाटीलचा बेडरूममधील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये गौतमी ‘जिसे हसना रोना है वो प्यार करे ‘ या गाण्यावर शूट करत आहे. गौतमीने हा व्हिडिओ बेडरूममध्ये शूट केल्याने हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओला लोकांनी मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर केले असून प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
आदित्य ठाकरेंची फडणवीसांवर जोरदार टीका; म्हणाले, “समोर आलेल्या भ्रष्टाचारावर…”