Gautami Patil । नाशिक : गौतमी पाटील (Gautami) हे प्रत्येक घराघरात पोहोचलेलं नाव आहे. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वच जण तिचे चाहते आहेत. ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ अशी उपाधी तिला तिच्या चाहत्यांकडून मिळाली. तिच्या प्रत्येक कार्यक्रमांना तुफान गर्दी असते. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येते. तिच्या प्रत्येक कार्यक्रमात (Gautami Patil Programs) राडा ठरलेलाच असतो. अनेकदा परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतो. (Latest Marathi News)
Voter ID Card । मस्तच! आता मोबाइलच्या मदतीने तयार करता येणार मतदान कार्ड
सध्या ती एका वेगळ्याच कारणावरून चर्चेत आली आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वलखेड गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम (Nashik Gautami Patil Show Row) आयोजित करण्यात आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. गौतमीला शाळेत नाचवणारे घरी जातील, असा थेट इशारा दिला आहे. (Nashik Gautami Patil Show)
Sheep Farming । आजच सुरु करा कमी खर्चात मेंढीपालनाचा व्यवसाय, या प्रजातींचे करा संगोपन
“गौतमीला कोणी नाचवलं, हे आपल्याला माहित नाही. मुळात आमच्या जीआरप्रमाणे शाळा वाईन कंपन्यांना देण्यास बंदी असून एकाही शाळेचं खासगीकरण झालं नाही. जीआर सीएसआर मनीसंदर्भात आहे. तुम्हाला माहिती आहे का? सीएसआरचे पैसे NGO कडे जातात. एनजीओकडून विविध उपक्रम राबवले जातात. परंतु मुलांपर्यंत हे पैसे पोहोचत नाही”, असेही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
LPG Cylinder Price । मोठी बातमी! गॅस सिलेंडरच्या किमतींत तब्बल 209 रुपयांची वाढ