Site icon e लोकहित | Marathi News

गौतमी पाटीलने अर्धवट का सोडलं शिक्षण? का ठेवले लावणी क्षेत्रात पाऊल? वाचा सविस्तर माहिती

Gautami, who instilled in the boys, dropped out of class VIII to take care of the family; Read in detail

लावणी कलाकार गौतमी पाटील (Gautami Patil) मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान अंगावर पाणी ओतून, अश्लील हावभाव करून नाचताना गौतमीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यावरून सुरु झालेला वाद मिटण्याआधीच नुकत्याच तिच्या लावणी कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर तेजीत

या घटनांमुळे चर्चेत आलेली गौतमी पाटील ही मूळची धुळे येथील असून ती अवघ्या 26 वर्षांची आहे. घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे तिने लावणी क्षेत्रात पाऊल ठेवले. पत्रकार परिषदेत माहिती देताना गौतमी पाटील हिने याबद्दल सांगितले असून यावेळी तिने तिची घरची परिस्थिती कथन केली आहे.

संजय राऊत यांची न्यायालयातून सुटका; 100 दिवसांचा वनवास अखेर आज संपला

गौतमीच्या जन्मापूर्वीच तिचे आई वडील वेगळे झाले होते. तिच्या वडिलांनी काही कारणांमुळे तिच्या आईला नववा महिना सुरू असतानाच सोडून दिले. गौतमीच्या जन्मानंतर तिच्या आईने जॉब केला. बिसलेरी आणि इतर काही कंपन्यांमध्ये काम केलं. मात्र गौतमीचे शिक्षण सुरू असतानाच तिच्या आईचा अपघात झाला. यामुळे आईचे काम सुटले. परिणामतः गौतमीला शिक्षण सोडावे लागले.

फलटण सातारा हायवे प्रवाशांना ठरतोय धोकादायक

यामुळे गौतमीने पैसे कमावण्यासाठी ऑर्केस्ट्रामध्ये काम सुरू केले. महेंद्र बनसुळे सर यांच्याकडे ती कामाला होती. नंतर, अकलूज लावणी महोत्सवात गौतमीने बॅक डान्सर म्हणून काम केले तेव्हा तिला ५०० रुपये मानधन मिळाले होते. या कार्यक्रमानंतर खऱ्या अर्थाने गौतमीचे लावणी कलाकार म्हणून करिअर सुरू झाले.

स्वतःशीच लग्न करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केली प्रेग्नेंन्सीची पोस्ट; सोशल मीडियावर होतीये चर्चा

Spread the love
Exit mobile version