सबसे कातिल गौतमी पाटील अशी ओळख असणाऱ्या गौतमी पाटीलने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य केल आहे. त्यामुळे गौतमीला जत्रा, वाढदिवस अशा कार्यक्रमांमध्ये पैसे देऊन आमंत्रित केलं जातंया आहे. गौतमीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात तरून मुलं गर्दी करतात. जास्त गर्दी असल्यामुळे तरुणांचा गोंधळ देखील मोठ्या प्रमाणावर होतो.
ब्रेकिंग! जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बस दरीत कोसळली, ८ जण जागीच ठार
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील निमदरी गावाजवळील पिराचीवाडी येथील वेताळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त गौतमीला आमंत्रित करण्यात आलं होतं. व येथे हा कार्यक्रम गोंधळ न करता शांततेत पार पडला. गौतमीचा जुन्नर तालुक्यातील कार्यक्रम पाहण्यासाठी ७० ते ८० हजार नागरिकांनी हजेरी लावली होती. गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये अनेक वेळा गोंधळ झाल्याने कार्यक्रम थांबवण्यात देखील आले आहेत. परंतु या कार्यक्रमाच्या वेळी कोणताही गोंधळ झाला नाही हा कार्यक्रम शांततेत पार पडला.
या सर्वांचे श्रेय आदिवासी महिलांना देण्यात आले आहे. या सर्व महिलांच्या हातामध्ये काट्या व दांडगी होती. तसेच त्यांनी कडक बंदोबस्त देखील केला होता. गौतमी पाटील चे स्वतःचे सुरक्षा रक्षक व खाजगी कंपनीचे सुमारे २५ बाऊन्सर होते. यासोबतच जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. स्टेजसमोर महिलांना बसवल्यामुळे कोणताही गैरप्रकार घडून आला नाही. ज्या तरुणांनी कार्यक्रमांमध्ये गोंधळ केला त्या तरुणांना महिलांनी चोप देखील दिला. त्यामुळे कार्यक्रम शांततेत पार पडला.
श्रीगोंदा तालुक्यातील युवा शेतकऱ्याची कमाल! केली पिवळ्या कलिंगडाची लागवड