मागील काही दिवसांपासून गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हा चर्चेचा व महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी यासाठी आंदोलने केली जात आहेत. या ठिकाणची अतिक्रमणे काढल्यामुळे अनेक कुटुंबे भूमिहिन आणि बेघर (Homeless) होणार आहेत. म्हणून, परभणी येथे विविध संघटनांतर्फे आयोजित गायरान हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक मागण्या देखील करण्यात आल्या आहेत.
अक्षय कुमारने महिलांना दिले स्वसंरक्षणाचे धडे; कार्यक्रम सुरू असताना अचानक महिला ओरडू लागली!
आंदोनात करण्यात आलेल्या महत्त्वाच्या मागण्या
1) शासकीय जमिनीवर १९९५ पूर्वी राहात असलेल्या पारधी, दलित, आदिवासी कुटुंबांना राहत्या घराखालील जमिनीचे ८ अ चे उतारे कुटुंबाच्या नावे करावेत.
2) गायरान, वन, देवस्थान जमिनीवर पेरणी केलेल्या पिकांची व कास्तकारांना महसूल अधिनियमानुसार अर्जाप्रमाणे पंचनामा करावा.
3) विहितीखाली आणलेल्या गायरान जमिनीवर (Gayran Land) पेरणी केलेल्या पिकांचे विशेष पथके नेमून पंचनामा करून दंडात्मक कार्यवाही करून भाग अधिकार मूल्य घेऊन एक ई ला नोंद घेण्यात यावी.
4) गायरान जमिनीवरील घरासाठी तसेच शेतीसाठी केलेली अतिक्रमणे सरकारने नियमानुकुल करावीत.
5) शेती करणाऱ्या कास्तकारांना मालकी सातबारा देण्यात यावा.
वयाच्या साठीमध्ये प्रेयसीबरोबर दूर जाऊन राहण्यासाठी केले हे ‘कृत्य’, वाचून तुम्हालाही बसेल धक्का!
गायरान जमिनी उद्योजकांना हव्या त्या किंमतीत दिल्या जातात. हे थांबायला हवे अन्यथा आमच्या हक्कासाठी तालुक्याच्या ठिकाणी देखील आंदोलन केले जाईल. असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी चुकीच्या नोटीसा देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी विनंती देखील करण्यात आली आहे.
शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारला थेट इशारा; खुर्चीखाली बॉम्ब फुटेल! अशा शब्दात सुनावले