Krishi Seva Kendra । घरबसल्या मिळवा कृषी सेवा केंद्रासाठी परवाना, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

Get license for Krishi Seva Kendra from home, follow this process

Krishi Seva Kendra । गाव असो किंवा तालुका असो, तुम्हाला आज अनेक कृषी सेवा केंद्रांची दुकाने (Agricultural service center shops) पाहायला मिळत असतील. यंदा राज्यात मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकरी वर्ग पेरण्यांची लगबग करू लागला आहे. तुम्हाला कृषी सेवा केंद्रांबाहेर रासायनिक खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके खरेदी करण्यासाठी गर्दी पाहायला मिळत असेल. तुम्हीही हा व्यवसाय सुरु करू शकता. त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. (Latest Marathi News)

Raj Thackeray । भाजपने युतीसाठी ऑफर दिली आहे पण… राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

अशाप्रकारे करा अर्ज

जर तुम्हाला हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर सर्वात अगोदर तुमच्याकडे परवाना (License) असणे खूप गरजेचे आहे. परवान्याशिवाय तुम्हाला दुकान चालू करता येत नाही. त्याशिवाय तुमच्याकडे कृषी पदविका, कृषी विज्ञान विषयात पदवी (BSc.) मिळालेली असावी. तुम्ही आता घरबसल्या परवान्यासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला ‘आपले सरकार’ या पोर्टलवर अर्ज करता येईल. (Krishi Seva Kendra License)

Sheep Insurance । सरकारची मोठी घोषणा! 1 रुपयांत मिळणार मेंढ्यांचा विमा?

त्यानंतर सर्वात अगोदर नोंदणी करा. पुढे कृषी विभाग पर्याय निवडून ‘कृषी परवाना सेवा’ या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला बियाणे, रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांच्या विक्रीसाठीचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज करता येईल. त्यासाठी तुम्हाला बियाणे विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी 1,000 रुपये, रासायनिक खते विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी 450 रुपये आणि कीटकनाशके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी 7,500 रुपये शुल्क भरावे लागेल.

Lumpy Skin Disease । कोल्हापूरनंतर अहमदनगरमध्ये लम्पी आजाराने घातले थैमान; पशुपालक चिंतेत

कागदपत्रे

परवाना मिळवण्यासाठी तुमच्याकडे जागेचा गाव नमुना-8, कृषी सेवा केंद्र उभारायची जागा तुमच्या मालकीची नसल्यास भाडेपट्ट्याचा करार, ग्रामपंचायतचे ना-हरकत प्रमाणपत्र, शॉप अॅक्टचं प्रमाणपत्र, पॅन कार्ड,आधार कार्ड शैक्षणिक अर्हतेचं प्रमाणपत्र आणि पासपोर्ट फोटो असावा.

निसर्गाचा प्रकोप! भुस्खलन, मंदिर कोसळून 21 भाविकांचा मृत्यू

तुमचा ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर जिल्हा गुणनियंत्रण अधिकाऱ्यांकडे जातो. त्याला मंजुरी मिळताच तो कृषी उप-संचालक यांच्याकडे जातो. त्यांनी देखील मंजुरी दिल्यास तो अंतिम मंजुरीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे जातो. परंतु हे लक्षात ठेवा की हा परवाना 5 वर्षांनी नूतनीतकरण करावा. तसेच बेकायदेशीररित्या खतांची विक्री करू नका नाहीतर तुमचा परवाना रद्द केला जातो.

Varas Nond Online । आनंदाची बातमी! आता फोनवरच करता येणार वारस नोंदणी, कसं ते जाणून घ्या

Spread the love