
Ghagarkond Falls । रायगड : सध्या सगळीकडे पाऊस (Rain Update) झालेला पाहायला मिळत आहे. यामुळे नदी नाले तसेच धबधबे दुथडी भरून वाहत आहेत. धबधब्यांवर एक मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे बऱ्याच तरुणांना या ठिकाणी फिरण्यासाठी जाण्याचा मोह आवरत नाही. अनेक जण या ठिकाणी फिरण्यासाठी जात आहेत. मात्र या ठिकाणी फिरण्यासाठी जाणे अनेकांच्या जीवावर बेतत असल्याचे देखील समोर आले आहे. दरम्यान, रायगड मधील प्रसिद्ध घागरकोंड धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा मृत्यू
रायगड मधील प्रसिद्ध घागरकोंड धबधब्यात पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण धबधब्यात बुडाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या धबधब्यावर मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात मात्र या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेताना कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे या प्रकारच्या दुर्घटना घडत असतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्मित घाडगे असे या मृत तरुणाचे नाव आहे. स्मित आपल्या काही मित्रांसह या ठिकाणी पर्यटनासाठी आला होता. यावेळी कुंडात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे पर्यटन स्थळी फिरायला जाताना तरुणांनी योग्य ती काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून आव्हान करण्यात येत आहे.