Ghazipur News । सध्या एक भीषण अपघात झाला झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसला भीषण आग लागली. आगीमुळे अनेक प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, किती प्रवाशांचा मृत्यू झाला याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ही बस एका लग्न समारंभासाठी जात असताना वाटेत हाय टेंशन वायर बसवर पडल्याने बसला आग लागली. उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. (Uttar Pradesh News)
गाझीपूरमधील अपघाताची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. सीएम योगी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
Nilesh Lanke । शरद पवार गटात जाणार का? स्वतः आमदार निलेश लंके यांनी दिल स्पष्टीकरण
सूत्रांच्या माहितीनुसार, या बसमध्ये जवळपास 50 प्रवासी होते, ही बस एका लग्न समारंभातून परतत होती. त्यावेळी मरदह या ठिकाणी हा अपघात झाला. या अपघातानंतर जिल्ह्याधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.